| जे का रंजले
गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥३॥ ज्यासीं अपंगिता पाही । त्यासई धरी जो हृदयी ॥४॥ दया करणे जे पुत्रासी । तोचि दासा आणि दासी ॥५॥ तुका म्हणे सांगो किती । त्याचि भगवंताच्या मूर्ति ॥६॥ |
||||
| रचना | - | संत तुकाराम | ||
| संगीत | - | श्रीनिवास खळे | ||
| स्वर | - | पं. भीमसेन जोशी | ||
| राग | - | भैरवी (नादवेध) | ||
|
||||