| तुज सगुण म्हणों
कीं निर्गुण
रे । सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥ अनुमाने ना अनुमाने ना । श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥२॥ तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे । स्थूळसूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥ तुज आकारू म्हणों कीं निराकारू रे । आकारूनिराकारू एकु गोविंदु रे ॥४॥ तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे । दृश्याअदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥ तुज व्यक्त म्हणों कीं अव्यक्तु रे । व्यक्त अव्यक्त एकु गोविंदु रे ॥६॥ निवृत्ती प्रसादें ज्ञानदेवो बोले । बाप रखुमादेविवरू विठ्ठलु रे ॥७॥ |
||||
| रचना | - | संत ज्ञानेश्वर | ||
| संगीत | - | |||
| स्वर | - | सुधीर फडके | ||
|
||||