| देवाचिये द्वारीं
उभा क्षणभरी
। तेणें मुक्ति चारी साधलिया ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करीं ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेग करीं । वेद-शास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेवो म्हणे व्यासाचिये खुणे । द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥ |
||||
| रचना | - | संत ज्ञानेश्वर | ||
| संगीत | - | श्रीधर फडके | ||
| स्वर | - | सुरेश वाडकर | ||
|
||||