| पंढरीचा वास,
चंद्रभागे स्नान
। आणिक दर्शन विठोबाचे ॥१॥ हेची घडो मज जन्मजन्मांतरी । मागणे श्रीहरी नाही दुजे ॥२॥ मुखी नाम सदा संतांचे दर्शन । जनी जनार्दन ऐसा भाव ॥३॥ नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी । कीर्तन गजरी सप्रेमाचे ॥४॥ |
||||
| गीत | - | संत नामदेव | ||
| संगीत | - | श्रीनिवास खळे | ||
| स्वर | - | पं. भीमसेन जोशी | ||
|
||||