| भेटीलागीं जीवा
लागलीसे आस
। पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥ पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसे माझे मन वाट पाहें ॥२॥ दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥३॥ भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माऊलीची ॥४॥ तुका म्हणे मज लागलीसे भुक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥५॥ |
||||
| गीत | - | संत तुकाराम | ||
| संगीत | - | श्रीनिवास खळे | ||
| स्वर | - | लता मंगेशकर | ||
|
||||