येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई ॥१॥

भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा ॥२॥

इतुक्यासहित त्वां बा यावें, माझे रंगणी नाचावें ॥३॥

माझा रंग तुझे गुणीं, म्हणे नामयाची जनी ॥४॥
 
 
रचना - संत जनाबाई
संगीत - वसंत प्रभू
स्वर - आशा भोसले
 
www.aathavanitli-gani.com