| लहानपण देगा
देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥ ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥ जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥३॥ तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥४॥ महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥५॥ |
||||
| रचना | - | संत तुकाराम | ||
| संगीत | - | |||
| स्वर | - | कुमार गंधर्व | ||
|
||||