किती सांगुं तुला मज चैन नसे ॥

हें दु:ख तरी मी साहुं कसें ।
या समयिं मला नच कोणी पुसे ।
हा विरह सखे मज भाजितसे ।
मन कसें आवरूं ।
किती धीर धरूं । कसे करूं ॥

हे बंधु नव्हत मम वैरी खरे ।
दावीती कसें वरि प्रेम बरें ।
बोलोनी पाडीती हृदयासी घरे ।
नको नको मला जिव ।
विष तरि पाजिव ।
सखे सोडिव ॥
 
 
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत सौभद्र (१८८२)
राग - आनंद भैरवी (मूळ संहिता)
ताल - धुमाळी
 
www.aathavanitli-gani.com