धरिला वृथा छंद
नव्हतेच जर फूल, कोठून मकरंद ?

जरि जीव हो श्रान्त
नाही तृषा शान्त
जलशून्य आभास शोधीत मृग अंध

झाले तुझे भास
मी रोधिले श्वास
माझीच मज आस घाली असा बंध

पथ सर्व वैराण
पायी नुरे त्राण
माझेच घर आज झाले मला बंद
 
 
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - सुरेश वाडकर
 
www.aathavanitli-gani.com