तुजसाठी शंकरा भिल्लीण मी झाले
धुंडित तूज आले

अंजन चर्चून चंद्रमुखाला, शामल सुंदर बनले
मृगाजिनाची कंचुकी घालून प्रतिबिंबाला हसले

नयनामधल्या जलगंगेला दुःख प्रीतिचे कथिले
म्हणते गंगा, ब्रम्ह कधी का मायेवरती रुसले
 
 
गीत - पी. सावळाराम
संगीत - स्नेहल भाटकर
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - चिमुकला पाहुणा (१९६७)
राग - मारुबिहाग (नादवेध)
 
www.aathavanitli-gani.com