| मुद्रिका अचुक
मी ओळखिली ही
त्यांची मज सांग अवस्था दूता, रघुनाथांची हातांत धनू तें, अक्षय भाता पृष्ठीं विरहांत काय ते राघव झाले कष्टी ? कां श्यामल वलयें नयनतळीं चिंतांचीं ? बसलेत काय ते लावुन कर कर्मातें ? विसरलेत काय ते दुःखें निजधर्मातें ? करितात अजुन ना कर्तव्यें नृपतीचीं ? सोडिले नाहिं ना अजुन तयांनीं धीरा ? का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा ? साह्यार्थ असति ना सैन्यें सन्मित्रांची ? इच्छिती विजय ना त्यांचा अवघे राजे ? का लोकप्रीतिला मुकले प्रियकर माझे ? विसरले थोरवी काय प्रभू यत्नांची ? का मलाच विसरुन गेले माझे स्वामी ? मी दैवगतीने पिचतां परक्या धामीं का स्मृती तयांना छळिते या सीतेची ? करतील स्वयें ना नाथ मुक्तता माझी ? धाडील भरत ना सैन्य, पदाती, वाजी ? कळतसे त्यांस का वार्ता रघुनगरीची ? का विपत्कालिं ये मोह तयांच्या चित्तीं ? पुसटली नाहिं ना सीतेवरची प्रीती ? करतील मुक्तता कधिं ते वैदेहीची ? त्या स्वर्णघडीची होइन का मी साक्षी ? कधिं रामबाण का घुसेल रावणवक्षीं ? वळतील पाउलें कधीं इथें नाथांचीं ? जोंवरी तयांचें कुशल ऐकतें कानीं तोंवरी सजिव मी असेन तैशा स्थानीं जन्मांत कधीं का होइल भेट तयांची ? |
||||
| गीत | - | ग. दि. माडगूळकर | ||
| संगीत | - | सुधीर फडके | ||
| गीतरामायण | ||||
|
||||