| सांज झाली तरी
माथ्यावरी उन्हाचे
भरते ! अशी एकाकी मी .... माझी मला .... माझी न मी उरते ! घाई जगण्याची, अशी दाटली गर्दी भवती आणि रसत्यात, भर उन्हात तुझा हात सुटला थकले मी धावुनी, सावलीचा पाठलाग करते सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते ! धागे तुटले जरी स्वप्ने तुझी विणता-विणता ती वीण आजही छातीतली निरगाठ आहे ही नजर आजही तू नेलेल्या दिवसात भिडते सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते ! |
||||
| गीत | - | गजेंद्र अहिरे | ||
| संगीत | - | भास्कर चंदावरकर | ||
| स्वर | - | साधना सरगम | ||
| चित्रपट | - | सरीवर सरी (२००५) | ||
|
||||