| ओंजळीत माझ्या
माझे उसासे आणि भोवताली आभाळ भासे ! कंठात हुंकार परतून गेले तळ्व्यात अश्रू किती वेचलेले कसे मीच माझे अवसान होते स्वप्नास माझ्या माझे दिलासे आणि भोवताली आभाळ भासे ! दिशा थांबलेल्या आणि बंद वाटा जगणेच आहे इथे साचलेले किती प्रष्ण भवती आणि मन रिकामे कशाचे करावे स्वत:शी खुलासे आणि भोवताली आभाळ भासे ! |
||||
| गीत | - | गजेंद्र अहिरे | ||
| संगीत | - | भास्कर चंदावरकर | ||
| स्वर | - | साधना सरगम | ||
| चित्रपट | - | सरीवर सरी (२००५) | ||
|
||||