आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे
जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर, तसे तयाने यावे
विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळवा, हाती हात धरावे
सोडुनिया घर, नाती-गोती
निघून जावे तया संगती, कुठे तेही ना ठावे
गीत
-
ग. दि. माडगूळकर
संगीत
-
सुधीर फडके
स्वर
-
आशा भोसले
चित्रपट
-
मुंबईचा जावई (१९७०)
राग
-
मल्हार
(नादवेध)