कशी तुज समजावू
सांग
का भामिनी उगिच
राग ?
हास्याहुन मधु
रुसवा
हेमंती उष्ण
हवा
संध्येचा साज
नवा
हा का प्रणयानुराग
?
चाफेकळी केवी
फुले
ओष्ठ-कमल जेवी
उले
भोवती मधुगंध
पळे
का प्रसन्न
वदन राग ?
वृत्तींचा होम
अमुप
त्यात जाळू
गे विकल्प
होवुनिया निर्विकल्प
अक्षय करु यज्ञ-याग
ओठांचे फेड
बंध
गा इकडे मुक्तछंद
श्वासांचे करू
प्रबंध
हृदयांचे मधु
प्रयाग
|