कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्रला मला ते पाय
अंतरले, कुळाला काळिमा आला
कशी राहिल कांतारी विरागी जानकी राणी
तिच्या वाटेवरी आता फुलांनो पाकळ्या घाला
तुझे सौभाग्य सौमित्रा, वनी तू राघवासंगे
अभागी मीच हा ऐसा जावुनी सांग रामाला
गीत
-
राजा बढे
संगीत
-
पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर
-
अरविंद पिळगावकर
नाटक
-
धाडिला राम तिने का वनी (१९७७)