घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला
देते जलसंजीवन बंधुजीव आसुसला

कळे न काही आज असा का अशोक हिरमुसला
थांब जरा मंदारा विसरले न मी तुला

पिऊनि चांदणे चरात चांदरात ओसरता
खुणावीत मधुनलिनी बोलविती हळूच मला
 
 
गीत - राजा बढे
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - आशा खाडिलकर
नाटक - धाडिला राम तिने का वनी (१९७७)
For the printable version of this song, click here.