घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद
मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद

मिटता कमलदल होई बंदी भृंग
तरि सोडिना ध्यास, गुंजनात दंग

बिसतंतू मृदु होति जणु व्रजबंध
स्वरब्रम्ह आनंद ! स्वर हो सुगंध
 
 
गीत - पुरुषोत्तम दारव्हेकर
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - पं. वसंतराव देशपांडे
नाटक - कट्यार काळजात घुसली (१९६७)
राग - धानी (पं. वसंतराव देशपांडे)(नादवेध)
सलगवरली (पं. जितेंद्र अभिषेकी)
For the printable version of this song, click here.