छत आकाशाचे आपुल्या घराला सखये
तृणांकुरांची शय्या आणिक तुझाच बाहु उशाला
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला सखये

गळ्यात घालुनी गळे सखये मिळुनी ही धुंद करू उपवने
सुरात मिसळून सूर उलगडू दोन जीवांची मने
स्वैर मोकळे पिसाट जगूया भिरकावुनी दुनियेला
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला सखये

साहु कशी विजने प्रियतमे जाऊ नको परदेसी
तुझ्यावाचुनी मोडून घरटे होईन मी वनवासी
पंख नभाचे लावून उडूया सोडून या धरतीला
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला सखये
 
 
गीत -
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - अजित कडकडे
नाटक - कधीतरी कुठेतरी
For the printable version of this song, click here.