जा उडुनी जा पाखरा
नयन मनोहर पाहुनी परिसर भुलू नको रे जरा

चंचल खग हे पंख पसरुनी आक्रमिती अंबरा
स्वातंत्र्याची मंगल गीते गात चालले घरा
तूही उडूनी जा पाखरा

दिशादिशा या गुलाल उधळीत करिती सण साजरा
रवीकिरणांनी आज उजळला गगनाचा उंबरा
जा जा सोडुनी या तरुवरा
 
 
गीत - पुरुषोत्तम दारव्हेकर
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - अरविंद पिळगावकर
नाटक - नयन तुझे जादुगार
For the printable version of this song, click here.