तुझा गे नितनूतन
सहवास !
तुझेच चिंतन
करितो अनुदिन
एक तुझा मज
ध्यास !
या प्राणांच्या
क्षितिजावरती
भाग्यवती तू
उषा उमलती
मम हृदयीच्या
विरहतमाचा
करसी सहज निरास
!
किती करावी
प्रिये प्रतिक्षा
?
प्रणायार्ताला
का ही शिक्षा
?
दिशांदिशातुन
अवकाशातुन
तुझे मधुर आभास
!
|