दशदिशांस पुसतो,
पुसतो वेड्या
नभा
ती कुठे राजसा
माझी प्रियवल्लभा
?
क्षण दिसली,
लपली फिरुनी
मृगलोचना
का करिसी दैवा
क्रूर अशी वंचना
?
ते स्वप्न संपले,
स्तिमित इथे
मी उभा !
मज क्षणाक्षणाला
रूप तिचे भासते
छ्ळतात जिवाला
दाहक आभास ते
तिमिरांध सूर्य
मी शोधित फिरतो
प्रभा !
|