दिवस आजचा असाच
गेला उद्या
तरी याल का
?
राया अशी, जवळ
मला घ्याल का
?
पैठणी जांभळी
जरीबुंद नेसुनी
मी वाट पाहते
केव्हाची बैसुनी
ही घडीमागुनी
घडी जातसे सुनी
जागरणाने जळती
डोळे; काजळ
घालाल का ?
किती किती योजिले
होते बोलायचे
मज गूज मनीचे
होते खोलायचे
संगतीत तुमच्या
होते उमलायचे
कळ्या आजच्या
शिळ्या उद्याला;
ओठाशी न्याल
का ?
या सरत्या राती
तळमळते मी अशी
लोळते पलंगी
पुन्हा बदलते
कुशी
मज रुते बिछाना,
नको नको ही
उशी
हवा वाटतो हात
उशाला, सजणा
तुम्हि द्याल
का ?
|