नाचत ना गगनांत । नाथा ।
तारांची बरसात ॥

आणित होती । माणिक मोतीं ।
वरतुनि राजस रात ॥

नाव उलटली । माव हरपली
चंदेरी दरियांत ॥

ती ही वरची ।
देवाघरची दौलत लोक पहात ॥
 
 
गीत -
संगीत - किर्लोस्कर नाटक मंडळी
स्वर - पं. जितेंद्र अभिषेकी
नाटक - संगीत पुण्यप्रभाव (१९१७)
राग - पहाडी (नादवेध)
ताल - आनपरी दरबार
For the printable version of this song, click here.