निर्गुणाचा
संग धरिला जो
आवडी ।
तेणें केलें
देशोधडी आपणियाशी
॥१॥
अनेकत्व नेलें
अनेकत्व नेलें
।
एकलें सांडिलें
निरंजनीं, मायबापा
॥२॥
एकत्व पाहतां
अवघें लटिकें
।
जें पाहें तितुकें
रूप तुझें,
मायबापा ॥३॥
म्हणे गोरा
कुंभार सखया
पांडुरंगा
तुम्हा आम्हा
ठावा कैसे काय,
मायबापा ॥४॥
|