पांडुरंग त्राता
पांडुरंग दाता
।
अंतीचा नियंता
पांडुरंग ॥१॥
दयेचा सागर
मायेचे आगर
।
आनंदाचे घर
पांडुरंग ॥२॥
भक्तीचा ओलावा
दृष्टीचा दृष्टावा
।
श्रद्धेचा विसावा
पांडुरंग ॥३॥
तप्तांचे चंदन
दिप्तांचे इंधन
।
प्रकाश वर्धन
पांडुरंग ॥४॥
अंगसंगे त्याच्या
झालो मी निःसंग
।
देहीचा साष्टांग
पांडुरंग ॥५॥
|