बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥

येणे सोसें मन झालें हांवभरी ।
परती माघारीं घेत नाहीं ॥२॥

बंधनापासोनी उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाश ॥३॥

तुका म्हणे देह भारिला विठ्ठले ।
कामक्रोधे केले घर रीतें ॥४॥
 
 
रचना - संत तुकाराम
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - पं. जितेंद्र अभिषेकी
For the printable version of this song, click here.