मन लोभले मनमोहने गीतांत न्हाली
तुजमुळे साधीसुधी संभाषणे
तू पाहता फुलल्या कळ्या
बागेतल्या, हृदयातल्या
झाली निराळी स्पंदने
कळले मला दिसताच तू
माझीच तू, माझीच तू
माझे तुझे नाते जुने
ना योजिता नजरेतूनी
मन जाय पुरते वाहुनी
आता कशाची बंधने ?
गीत
-
सुधीर मोघे
संगीत
-
राम फाटक
स्वर
-
पं. जितेंद्र अभिषेकी