हे नंदलाल
मुरलीधर श्याम

तूच गुरू एकच त्राता
संगीताचा तू उद्गाता
तारक तव शुभनाम

तूच स्वरेश्वर
तू लयभास्कर
कलासाधका तूच विधाता
प्रतिभेचे सुखधाम
 
 
गीत - पुरुषोत्तम दारव्हेकर
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - प्रसाद सावकार
नाटक - कट्यार काळजात घुसली (१९६७)
राग - पूर्वा कल्याण (नादवेध)
For the printable version of this song, click here.