या भवनातिल गीत पुराणे
मवाळ, हळवे सूर,
जाऊ द्या, आज येथुनी दूर
भावभक्तिची भावुक गाथा
पराभूत हो नमविल माथा
नवे गीत अन् नवे तराणे
हवा नवा तो नूर
गीत
-
पुरुषोत्तम दारव्हेकर
संगीत
-
पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर
-
पं. वसंतराव देशपांडे
नाटक
-
कट्यार काळजात घुसली (१९६७)
राग
-
बिहागडा
(नादवेध)