रूपसुंदर सखी
साजिरी गुणखणी
दूर जाता उरे
काय या जीवनी
?
पाहु कोठे अता
मोहना ती प्रिया
?
शांतवू मी कसा
विकल हृदयास
या ?
प्रीतिसुम लोपले
एकदा उमलुनी
!
हरपली माधुरी,
संपली चारुता
राहिली व्यापुनी
अंतरा शून्यता
आज वीणेवरी
मूक हो रागिणी
!
रमविती ना जिवा
रम्य संध्याउषा
काय मजला अता
पौर्णिमेची
निशा ?
आग ओली झरो
शीत ज्योत्स्नेतुनी
!
|