घर थकलेले संन्यासी, हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
डग ओढून संध्येवाणी, आभाळ घसरले होते

पक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळी मागे, असतेच झ-याचे पाणी

मी भीऊन अंधाराला, अडगळीत लपुनी जाई
ये हलके हलके मागे, त्या दरीतली वनराई
 
 
गीत - ग्रेस
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट - निवडुंग (१९८९)
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.
  Grace
  Grace