लेऊ कशी वल्कला ते जुळे न बाई मला

नीट निरीची गाठ न जुळते
निरीवरती निरी न मिळते
कटीवरुनी सरते ओघळते असोवरी मेखला

हवी कशाला मणी-भूषणे
जवळी असता अहेव लेणे
डागतील मज सये दगिने माळीन चंपक फुला
 
 
गीत - राजा बढे
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - आशा खाडिलकर
नाटक - धाडिला राम तिने का वनी (१९७७)
राग - अमृतवर्षिणी (संगीत-सरिता)
For the printable version of this song, click here.