विकल मन आज झुरत असहाय !
नाहि मज चैन, क्षणक्षण झरति नयन
सांगू कोणा ?

ही चांदरात, नीज नच त्यात,
विरह सखी मी कुठवर साहू ?
नाहि मज चैन, क्षणक्षण झरति नयन
कोणा सांगू ?
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - बकुळ पंडित
नाटक - हे बंध रेशमाचे (१९६८)
राग - सरस्वती (संगीत-सरिता)
For the printable version of this song, click here.