विषुमय जग वैषवाचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ॥१॥
आइकाजी तुम्ही भक्त भागवत ।
कराल ते हित सत्य करा ॥२॥
कोणाही जीवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वर पूजनाचे ॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव भोग पावे ॥४॥
रचना
-
संत तुकाराम
संगीत
-
पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर
-
पं. जितेंद्र अभिषेकी