हरिभजनाविण
काळ घालवू नको
रे
दोरीच्या सापा
भिवुनी भवा
भेटी नाही जिवा-शिवा
अंतरीचा ज्ञानदिवा
मालवू नको रे
विवेकाची ठरेल
ओल
ऐसे की बोलावे
बोल
आपुल्या मते
उगीच चिखल कालवू
नको रे
संत संगतीने
उमज
आणुनि मनी पुरते
समज
अनुभवावीण मान
हालवू नको रे
सोहिरा म्हणे
ज्ञानज्योती
तेथ कैचि दिवस-राती
तयावीण नेत्रपाती
हालवू नको रे
|