पथ जात धर्म
किंवा नातेहि
ज्या न ठावे
ते जाणतात एक
प्रेमास प्रेम
द्यावे
हृदयात जागणाऱ्या
अतिगूढ संभ्रमाचे
तुटतील ना कधीही
हे बंध रेशमाचे
!
विसरून जाय
जेव्हा माणूस
माणसाला
जाळीत ये जगाला
विक्राळ एक
ज्वाला
पुसतात डाग
तेही धर्मांध
आक्रमाचे
तुटतील ना कधीही
हे बंध रेशमाचे
!
क्षण एक पेटणारे
हे युद्धवेड
आहे
देहाहुनी निराळी
रक्तास ओढ आहे
तीर्थाहुनी
निराळे पावित्र्य
संगमाचे
तुटतील ना कधीही
हे बंध रेशमाचे
!
हे बंध रेशमाचे
ठेवी जपून जीवा
धागा अतूट हाच
प्राणात गुंतवावा
बळ हेच दुर्बळांना
देती पराक्रमाचे
तुटतील ना कधीही
हे बंध रेशमाचे
!
|