अलवार तुझी चाहूल का धडधडते हे ऊर
मनास का उमगेना तू समीप की रे दूर

घन वादळवाऱ्यातून मी जपले सारे सूर
कोंदणात आनंदाच्या लपविले असे काहूर

अलवार तुझी चाहूल का धडधडते हे ऊर
मनास का उमगेना तू समीप की रे दूर
 
 
गीत - अजेय झणकर
संगीत - आनंद मोडक
स्वर - कविता कृष्णमूर्ती
चित्रपट - सरकारनामा
For the printable version of this song, click here.