निळे गगन, निळी धरा, निळे निळे पाणी
ही आगळी कहाणी, ही वेगळी कहाणी !

माती ही मायमाऊली, गंधाने चिंब नाहली
वारसा तिचा, खरा दास मी तिचा
नाती ही आमुची पुराणी !

हिरवळ ही मुक्या मनाची, पांघरते शाल उन्हाची
झाड डोलते हळू पान बोलते, फांदीवरी कुहूकुहू गाणई !

हुंदडती गाय-वासरे, बागडती चिमणपाखरे
मुला-फुलांची, अशी चिलापिलांची
दुनिया ही भाबडी अडाणी !

आनंदी जिणे जगावे, अंतर उजळून निघावे
प्रेम लुटावे असे गात सुटावे, सोडवीत सुखाची उखाणी
 
 
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - एन्‌. दत्ता
स्वर - जयवंत कुलकर्णी
चित्रपट - मामा भाचे (१९७९)
For the printable version of this song, click here.
   
  Mama Bhache