पाऊस कधीचा
पडतो, झाडांची
हलती पाने
हलकेच जाग मज
आली, दु:खाच्या
मंद सुराने.
डोळ्यात उतरले
पाणी, पाण्यावर
डोळे फिरती
रक्ताचा उडला
पारा, या नितळ
उतरणीवरती.
पेटून कशी उजळेना,
ही शुभ्र फुलांची
ज्वाला
ता-यांच्या
प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला.
संदिग्ध घरांच्या
ओळी आकाश ढवळतो
वारा
माझ्याच किना-यावरती
लाटांचा आज
पहारा.
|