केतकीच्या बनात
उतरत्या उन्हात
सळ्सळ् पानात
जपून जा
जपून जा गडे
जपून जा कुठे
निघेल नाग
पायवाट लपेल,
काटाकुटा रुतेल,
तळव्यात खुपेल,
जपून जा
ढग येता दाटून,
मग वाट कोठून,
पाय ठेवा रेटून,
जपून जा
जपून जा गडे
जपून जा कुठे
निघेल नाग
उसळत्या वयात,
बळ तुझ्या पायात,
चाल ठेव कह्यात,
जपून जा
फसू नको मोहात,
जरा उभी रहात,
मागेपुढे पहात,
जपून जा
जपून जा गडे
जपून जा कुठे
निघेल नाग
वादळाच्या वाऱ्यात,
नको चालू तोऱ्यात,
पडशील भवऱ्यात,
जपून जा
जाऊ नको गुंगत,
स्वप्नात रंगत,
तुझी तुला संगत,
जपून जा
जपून जा गडे
जपून जा कुठे
निघेल नाग
|