घेऊ कसा उखाणा,
घेऊ कसा उखाणा
?
का लाजले अशी
मी, माझे मला
कळेना
माझ्या मनोमनी
मी कमलापरी
फुलावे
या कमललोचनांनी
कमलावरा पहावे
शुभनाम या प्रभुचे
का ठाउके न
कोणा ?
स्पर्शातल्या
सुधेने हे अंग
अंग न्हाले
या रम्य दर्शनाने
डोळे कृतार्थ
झाले,
शब्दांत काय
सांगू छेडून
भाववीणा ?
मज रूप लक्षुमीचे
तू नाथ शेषशायी
माझी अनन्यप्रीती
झाली विलीन
पायी
माझ्यापुढे
उभा तू साक्षात
देवराणा
|