हरिचे प्यारे
हरिजन सारे
समतेच्या मंदिरी
कुणी न मालक,
कुणी न सेवक
जनता येथे राज्य
करी
गगनभेदी उंच
हवेली
तिथेच काही
दीन झोपडी
शाल पांघरुन
धनिक झोपतो
वस्त्राविण
ही गरिबी उघडी
धनिक न कोणी,
गरीब न कोणी,
एक चूल ती घरोघरी
प्रत्येकाचे
नाव प्रभू तो
कणाकणावर सदैव
लिहितो
ज्याचे त्याला
कण ते मिळता
कोण उपाशी कसा
राहतो ?
कुणी न उपाशी,
कुणी न अधाशी,
नसेल जेथे कुणी
भिकारी
मायपित्याचे
दर्शन घ्याया
वंचित झालो
आम्ही लेकरे
बंधमुक्त ही
त्यास कराया
एकजुटीने चला
चला रे
आम्ही न साधु,
आम्ही न भोंदु,
सत्यशांतीचे
आम्ही पुजारी
|