तुझ्या पंखावरूनि या मला तू दूर नेशिल का ?
तुझ्या या धुंद सुमनाचा मला तू गंध देशिल का ?

धुंद हवा, गंध नवा, हवेत हा गारवा
साथ तुझी त्यात अशी मला मिळे राजिवा
प्रीतीच्या स्वप्नी सदा, असाच येशील का ?

आज नवे गीत हवे सांगे मनोभावना
आज दिसे विश्व कसे नवे नवे लोचना !
नित्य असा सांग सदा माझाच होशिल का ?
 
 
गीत - गंगाधर महांबरे
संगीत - एन्‌. दत्ता
स्वर - उषा मंगेशकर, रवींद्र साठे
चित्रपट - प्रीत तुझी माझी (१९७५)
For the printable version of this song, click here.