दोन घडीचा डाव
त्याला जीवन ऐसे नाव

जगताचे हे सुरेख अंगण
खेळ खेळु या सारे आपण
रंक आणखी राव

माळ यशाची हासत घालू
हासत हासत तसेच झेलू
पराजयाचे घाव

मनासारखा मिळे सौंगडी
खेळाला मग अवीट गोडी
दुःखाला नच वाव
 
 
गीत - शांताराम आठवले
संगीत - केशवराव भोळे
स्वर - मंजू, अनंत मराठे
चित्रपट - रामशास्त्री (१९४४)
For the printable version of this song, click here.