धुंद आज डोळे
हवा धुंद झाली
गाली तुझ्या
ग कशी लाज आली
?
जसा सोनचाफा
तुझी गौर कांती
नको सावरू ग
तुझे केस हाती
डौल पारव्याचा
तुझ्या मस्त
चाली
बंडखोर वारा
तुला शीळ घाली
!
नको दूर जाऊ
सखी थांब थोडी
किनाऱ्यास भेटे
अशी लाट वेडी
तुझी पापणी
का झुके आज
खाली ?
घडी मीलनाची
तुषारांत न्हाली
!
तुझ्या यौवनाचा
फुलावा पिसारा
फुटावा कळीला
दवाचा शहारा
हवे ते मिळाले
अशा रम्य काली
नवी रूपराणी
नवा साज ल्याली
|