वा-याने हलते
रान
तुझे सुनसान
हृदय गहिवरले;
गायीचे डोळे
करुण उभे की
सांज निळाईतले
.....
डोळ्यात शीण
हातात वीण
देहात फुलांच्या
वेगी;
अंधार चुकावा
म्हणून
निघे बैरागी
.....
वाळूंत पाय
सजतेस काय ?
लाटान्ध समुद्राकाठी
चरणात हरवला
गंध
तुझ्या की ओठी
?
शून्यात गर्गरे
झाड
तशी ओढाळ
दिव्यांची नगरी
वक्षात तिथीचा
चांद
तुझा की वैरी
? |