दरबार जुना
हो हंड्या झुंबर
नवं
मध्यान्ह रातीला
आता लावा अत्तर
दिवं
अंगाअंगी मी
रंग खेळते,
केसामधी मरवा
पिकल्या पानाचा
देठ कि हो हिरवा
!
नख लागंल बेतानं
खुडा
केशरी चुना
अन् कात केवडा
लई दिसानं रंगल्
विडा
व्हटाची लाली
टिपुनी घ्याया
मुखडा असा फिरवा
पिकल्या पानाचा
देठ कि हो हिरवा
!
थोडी झुकून
थोडी वाकते
पडला पदर, लाज
झाकते
नेम धरून बाण
फेकते
तुमची माझी
हौस इश्काची
हळू हळू पुरवा
पिकल्या पानाचा
देठ कि हो हिरवा
!
|