तू गुपित कुणाला
सांगू नको आपुले
मी नवनवलाचे
स्वप्न काल
पाहिले !
स्वप्नात सावळा
हरी
ये वाजवीत बासरी
त्या मधुर स्वरांनी
मन माझे मोहिले
!
कर घालुनि माझ्या
गळा
गुजगोष्टि करी
सावळा
हलकेच तये अधरास
अधर जुळविले
!
मी दचकुन उठले,
गडे
परि घडू नये,
ते घडे
कपट्याने माझे
हृदयच, गे,
चोरिले !
|