अनाम वीरा,
जिथे जाहला
तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे
ना कुणी बांधला,
पेटली ना वात
!
धगधगत्या समराच्या
ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव
संसारातुन उठोनिया
जाशी !
मूकपणाने तमी
लोपती संध्येच्या
रेषा
मरणामध्ये विलीन
होसी, ना भय
ना आशा !
जनभक्तीचे तुझ्यावरी
नच उधाणले भाव
रियासतीवर नसे
नोंदले कुणी
तुझे नाव !
जरी न गातिल
भाट डफावर तुझे
यशोगान !
सफल जाहले तुझेच
हे रे, तुझे
बलिदान !
काळोखातुनि
विजयाचा ये
पहाटचा तारा
प्रणाम माझा
पहिला तुजला
मृत्युंजय वीरा
!
|